मळेवाडचा युवक बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला…

बिबट्याने केली युवकाची पाठलाग:- भयभीत झालेल्या सतीश नाईक यांनी लागलीच वनविभागाला संपर्क करून घटनेची दिली माहिती..

⚡सावंतवाडी ता.०२-: मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून निरवडे येथे कामानिमित्त गेला होता.मात्र काल गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना ,घोडेमुख पायथ्या नजीकच्या मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याची वाडी(खुळादेववाडी) येथे झडप घालण्याच्या तयारीत असलेला बिबट्या त्याच्या नजरेस पडला.मात्र कुत्रा असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. परंतु मागे वळून पाहिले तर त्याच्या मागून चक्क बिबटा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच त्याने गाडी जोरात पळवित मळेवाड ला येत याबाबत घडलेली घटना ग्रामस्थांना दिली आणि याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली.मात्र घडलेली घटनेमुळे सतीश नाईक हा युवक भांबावलेला दिसत होता.

सध्या सगळीकडे हे जंगली प्राणी भक्षाच्या शोधात मानवी वस्तीत येऊ लागले आहेत.पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत.त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत. वनखात्याने तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे.

You cannot copy content of this page