⚡वेंगुर्ला ता.०२-: तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथे मित्रप्रेम कला – क्रीडा मंडळातर्फे आयोजित व पुरस्कृत करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न आज शुक्रवारी ज्येष्ठ नागरिक सुभाष कासले व जनार्दन कासले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रल्हाद सोनसुरकर, सचिन गडेकर, कुलदीप परब, जीजी गडेकर, मित्रप्रेम संघांचे ज्येष्ठ खेळाडू दादा आईर, समिर गडेकर, सत्यवान कुडाळकर, दिलीप सोनसुरकर, किशोर सोनसुरकर, जीवन कुडाळकर, विनोद कुडाळकर, तसेच अशोक गडेकर, किशोर कासले, प्रवीण गडेकर, मानस रेडकर, यश आईर, जिजी कासले, गौरव शेणई, ओंकार धुरी, संदिप परब,पत्रकार अजय गडेकर आदीसह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. मित्रप्रेम कला क्रीडा मंडळ पुरस्कृत प्रथम पारितोषिक 20,026 व कायमस्वरूपी चषक, द्वितीय पारितोषिक 15,026 व कायमस्वरूपी चषक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज,अंतिम सामनावीर, मालिकावीर, उद्योनमुख खेळाडू अशी आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असून स्पर्धा तीन दिवस चालणार आहे.
आडेली खुटवळवाडी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन…
