आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात ‘वाचन पंधरवडा उपक्रम साजरा’…

⚡दोडामार्ग ता.०२-: आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालय, दोडामार्ग येथे ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम पार पडत आहे. त्यावेळी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पुस्तकाचे सामूहिक वाचन केले, तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही केले गेले होते. याचबरोबर ग्रंथ परीक्षण स्पर्धा, ग्रंथदिंडी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


आजच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृती पासून दुरावत चालला आहे. घरातील पुस्तकाची जागा आज हातामध्ये मोबाईलने घेतली आहे, या तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची गरज आहे यासाठीच महाराष्ट्र शासनाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
1 ते 15 जानेवारी दरम्यान वाचन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सामूहिक ग्रंथ वाचन केले या कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे साजरा होत असलेल्या पंधराव्यामध्ये ग्रंथ प्रदर्शन वाचन कौशल्य मार्गदर्शन ग्रंथ परीक्षण व्याख्यान, ग्रंथ परीक्षण कथा स्पर्धा, सर्वांसाठी मुक्त वाचन प्रवेश इ. उपक्रम घेण्यात येणार आहेत या उपक्रमामध्ये विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य एम. व्ही. गोळसे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page