वेंगुर्ला तालुक्यातील विकास कामे मार्गी लागण्यासाठी भाजपाचे नेहमी प्रयत्न…

मनीष दळवी:पाल गावात २ कोटी रुपयांच्या तीन विकास कामांची भूमिपूजन..

⚡वेंगुर्ला ता.०१-: तालुक्यातील
पाल गावातील तीन महत्वाच्या विकास कामांना मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळ निधीतून आणि बजेट मधून मिळून सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन बुधवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व भाजप तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या उपस्थितीत करण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यातील विकास कामे मार्गी लागण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेहमी प्रयत्न राहतील असे यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले.
पाल गावातील विकास कामे पुर्ण व्हावीत यासाठी सरपंच कावेरी गावडे आणि सोसायटी चेअरमन कमलेश गावडे यांचे प्रयत्न असतात. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील पाल झेंडोबा मंदिर ते अणसुर पुलापर्यंत संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी एक कोटी रुपये, आणि आसोली पाल खारभूमी बंधारा बांधणे या कामासाठी ७० लाख रुपये निधी मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या महाराष्ट्र सागरी मंडळ निधीतून मंजूर झाला आहे. तसेच वादळवाडी स्कूल या ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे या कामासाठी महाराष्ट्र शासन सन २०२४/२५ बजेट अंतर्गत २० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. गावातील यात त्यांनी महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन मनीष दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, नगरसेवक प्रणव वायंगणकर, तुळस माजी सरपंच शंकर घारे, पाल सरपंच कावेरी गावडे, सदस्य श्रीकांत गावडे, प्रदीप मुळीक, स्नेहल पालकर, शामल केरकर तसेच राजू गावडे, अनिल गावडे, हरी गावडे, ओंकार गावडे, अंकुश गावडे, नंदू गावडे, मधुकर गावडे, सिताराम गावडे आणि झेंडोबा कला क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

पाल : विकासकामांचे भूमिपूजन करताना पाल सरपंचा कावेरी गावडे, उपस्थित मनिष दळवी, पप्पू परब व अन्य

You cannot copy content of this page