भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती..
⚡वेंगुर्ला ता.०१-: म्हापण-पाट येथे रिक्षा चालक-मालक संघटना म्हापण-पाट व पिंपळपार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून रिक्षा चालक व स्थानिक ग्रामस्थांचा उत्साह वाढवला.
कार्यक्रमाला संबोधित करताना विशाल परब म्हणाले, “रिक्षा चालक हा समाजाचा महत्त्वाचा दुवा आहे. कष्टकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हापण व पाट परिसरातील संघटनांनी एकत्र येऊन राबवलेला हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे.”
लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंपळपार मित्र मंडळाचे सदस्य तसेच रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, व्यापारी व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर नाथा मडवळ, सुरेश ठाकूर, निकिता राऊळ, सुनील करलकर, माजी सभापती विकास गावडे, भुषण देसाई, विशाल वेंगुर्लेकर (विद्यमान सदस्य, कोचरा), कास गावचे सरपंच प्रवीण पंडित, अमय पै यांच्यासह अनेक स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
