नट वाचनालयात कै. डॉ. बी. बी. गायतोंडे यांचा जन्मदिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.०१-: येथील नट वाचनालयात बांदा गावचे सुपुत्र तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांचा जन्मदिन दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. या जन्मदिनाचे औचित्य साधून कै. डॉ. गायतोंडे यांच्या पत्नी श्रीम. निर्मला गायतोंडे यांनी नट वाचनालयाला पुस्तके सुरक्षित ठेवण्यासाठी स्टील कपाट देणगी स्वरूपात दिले. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल वाचनालयाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून डॉ. गायतोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सेक्रेटरी राकेश केसरकर, सदस्य जगन्नाथ सातोस्कर, शंकर नार्वेकर, सौ. स्वप्निता सावंत, अनंत भाटे, संजय हेंद्रे, पूजा कामत तसेच अनेक वाचक उपस्थित होते. वाचनालयाच्या ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, लिपिक ओंकार राऊळ व शिपाई अमिता परब यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
यावेळी एस. आर. सावंत, अनंत भाटे व शंकर नार्वेकर यांनी कै. डॉ. गायतोंडे यांच्या सामाजिक व व्यावसायिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून आभार मानले.
फोटो:-
बांदा नट वाचनालय येथे कपाटाच्या चाव्या सुपूर्द करताना मान्यवर.

You cannot copy content of this page