आचरा कॉलेजच्या एनएसएस शिबिरात “यशाची गुरुकिल्ली” विषयावर व्याख्यान संपन्न…

⚡मालवण ता.२७-:
पळसंब येथे आयोजित आचरा मॅनेजमेंट स्टडीज आचरा महाविद्यालयाच्या एनएसएस श्रमसंस्कार शिबिरामध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. हंबीरराव चौगुले यांचे “यशाची गुरुकिल्ली” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यामध्ये प्रा. चौगुले यांनी विद्यार्थ्यांना यश कसे मिळवावे ? यश मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग, त्याचबरोबर यश मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे? याबाबत यशस्वी माणसांची उदाहरणे देऊन सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर आचरा मॅनेजमेंट स्टडीज आचरा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. नितेश सारंग प्रा.कांबळी प्रा. सौ दुखंडे प्रा.सौ.मुणगेकर उपस्थित होते. यावेळी प्रा. हंबीरराव चौगुले यांनी MPSC व UPSC परीक्षामधे कसे यश मिळवावे याबाबतही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रमसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी केले. या शिबिरात ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिबिरामध्ये अन्य व्याख्यात्यांचीही व्याख्याने संपन्न झाली. शिबिरा दरम्यान पळसंब परिसरामध्ये विद्यार्थ्यांनी तीन बंधारे बांधण्याचे काम केले.

You cannot copy content of this page