विशाल परब यांनी केली भाजपच्या माध्यमातून तेंडोली येथील कुटुंबियांस 25 हजार रुपयांची आर्थिक मदत…

⚡वेंगुर्ला ता.२७-: तालुक्यातील मठ येथील मठ कुडाळतिठा येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात मदन मेस्त्री (रा. तेंडोली,ता. कुडाळ ) यांचा मृत्यू झाला होता. याबाबत माहिती मिळताच भाजपा व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून अपघातात मृत्यू झालेल्या मदन मेस्त्री यांच्या कुटुंबियांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. मठ येथील कुडाळ तिठ्यावर झालेल्या भीषण अपघातात मदन मेस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून भारतीय जनता पार्टी व विशाल परब यांच्या माध्यमातून मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी भाजप प्रदेश सदस्य राजू राऊळ, वेंगुर्ला नगरसेवक सुहास गवंडळकर, तेंडोली सरपंच भाऊ पोतकर, परबवाडा माजी उपसरपंच प्रा. हेमंत गावडे आदी उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात 5 वर्षाची मुलगी, पत्नी, आई, वडील भाऊ व बहीण असा परिवार आहे.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने
सामाजिक संस्थानी, दात्यांनी आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.

You cannot copy content of this page