तिरोडा येथे २७ डिसेंबर रोजी गायन व वादन स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२६-: तिरोडा येथील नव तरुण हौशी कलाकार ग्रुप व जगदगुरू नरेंद्राचार्यची संगीत आराधना आयोजित,शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी भवानी मंदिर जवळ( तिरोडा भरडवाडी) येथे गाव मर्यादित गायन व वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून,या स्पर्धेत मोठा गटसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक रुपये ३०००/-सुरेंद्र भोसले यांजकडून,द्वितीय रुपये २०००/- डॉ. प्रसाद निखार्गे,तृतीय क्रमांक रुपये १०००/- शिवराम साळगावकर यांजकडून तर उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये ५००/-
लहान गट _ हार्मोनियम वादन व गायन ,प्रथम क्रमांक रुपये ३०००/-अमिता नाणोस्कर यांजकडून, द्वितीय क्रमांक रुपये २०००/-विवेक आडारकर यांजकडून, तृतीय क्रमांक रुपये १०००/- रेडी शाखा कडून तर उत्तेजनार्थ ५००/-
लहान गट पखवाज वादन, प्रथम क्रमांक रुपये ३०००/-(सुनील गाड यांजकडून,द्वितीय क्रमांक रुपये २०००/- संदेश केरकर यांजकडून तृतीय क्रमांक रुपये १०००/-वैभव नाणोसकर यांजकडून तर उत्तेजनार्थ पारितोषिक रुपये ५००/-
तसेच सर्व स्पर्धकांना सुनील पेडणेकर यांनी सन्मानचिन्ह तर प्रमाणपत्र केशव पेडणेकर यांनी पुरस्कृत केली आहेत.
तरी या स्पर्धेला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page