निवडून आलेल्या सर्व नगराध्यक्ष व नगरसेवकांना पालकमंत्री नाम. नितेश राणेंनी दिल्या शुभेच्छा…

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निकाल लागले आहेत. भाजपचे सावंतवाडी नगराध्यक्ष श्रध्दाराजे भोसले आणि वेंगुर्लेत राजन गिरप निवडून आलेले आहेत. भाजपाला मतदारांनी चांगली साथ दिली आहे. मालवण मध्ये ममता वराडकर, कणकवलीत संदेश पारकर नगराध्यक्ष पदासाठी निवडून आले आहेत. पालकमंत्री म्हणून नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे अभिनंदन करतो. शहर विकासासाठी कुठलाही पक्षपाती न करता 100 टक्के न्याय देण्याची हमी देतो. आ. निलेश राणे यांचे अभिनंदन, मालवण, कणकवली त्यांच्या नेतृत्वात जिंकली आहे. कणकवलीकरांनी शहरविकास आघाडीच्या नेत्यांनी व संदेश पारकर यांनी केलेल्या भावनिक आवाहनाला साथ दिली आहे. कणकवली शहरातील जनतेने दिलेला कौल मान्य असल्याची प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, भाजपचे कार्यकर्ते मालवण आणि कणकवली या दोन शहरामध्ये अतिशय प्रामाणिक लढले. लोकशाही मध्ये लोकमताचा आदर ठेवायचा असतो. कणकवली आणि मालवणमध्ये संघटनात्मक लढण्यासाठी निश्चित पावले उचलू. आ. निलेश राणे यांचे अभिनंदन करतो. कणकवलीत शहर विकास आघाडी चे आणि मालवण मध्ये या निवडणूकीचे नेतृत्व निलेश राणे यांनी केलं. त्यांचे अभिनंदन करतो. शहराच्या विकासासाठी जे जे शब्द दिले, त्याबद्दल मी सहकार्य करण्यासाठी तयार असेन. कारण जनतेने त्यांच्या शब्दावर विश्वास टाकून निकाल दिला आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे.

विकासकामांसाठी असलेला निधी हा जनतेचा असतो, राजकारणापलिकडे जावून काम करायचे आहे. विकास हाच केंद्रबिंदू मानून सरकारच्या माध्यमातून चारही ठिकाणी दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे. भाजप म्हणून अतिशय चांगली लढत आमच्या कार्यकर्त्यांनी दिली. माझ्या कार्यकर्त्यांनी अतिशय जोमाने काम केलं आहे. सावंतवाडी वेंगुर्लेत दोन्ही नगराध्यक्ष चांगल्या फरकाने निवडून आले आहेत. कणकवलीत समीर नलावडे आणि मालवण मध्ये शिल्पा खोत त्याचे अभिनंदन करतो. कारण त्यांनीही या निवडणूकीत चांगली लढत दिलेली आहे. कणकवलीतील जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. शहरविकास आघाडीच्या नेत्यांनी माझ्या विरुध्द एकत्र येत केलेली आघाडी आहे. कणकवलीत जनतेच्या भावना ज्या ज्या गोष्टी होत्या त्या निकालातून दिसल्या आहेत. आमच्या विरोधात सगळे पक्ष आले होते. सर्वजण एकत्र येत आघाडी केली, सर्वजण माझ्या विरोधात होते. मला नेतृत्वाला विचारावे लागेल की, समीर नलावडे त्यांना पराभूत करण्यासाठी आमचे सगळे लोक विरोधात गेले होते. आम्ही बोलून चर्चा करू. या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासमवेत असलेले सर्वजण कणकवीत विरोधात गेले. हे राणेंना सोबत काम करणारी लोक आहेत. मात्र, मी एवढाच शब्द दिलेला होता, या निवडणूकीत वातावरण खराब करायला देणार नाही. तो शब्द मी पाळला असल्याचे भावनिक मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

कणकवलीत हा जनतेने निकाल दिला आहे. या निवडणूकीच्या प्रचारात सर्व पक्षाने बाजू मांडली आहे. शहरविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडलेले मुद्दे जनतेने स्विकारले. संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली विकास कसा होतो ते पाहू..! मतदार विकले जातात हे असं एकाही पण कोणी आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे. निवडणुकांमध्ये प्रत्येक जण आपल्या प्रत्येक बाजूने लढत असतो. आपल्या पद्धतीने त्याच्यामध्ये कोण कमी जास्त अगर होत असेल तर शेवटी जनतेचा निर्णय अंतिम असतो. काहीठिकाणी नगरसेवकाला मतदान मिळतं पण नगराध्यक्षाला मतदान मिळत नाही म्हणजे जनता सुज्ञ आहे. कणकवलीची जनता, मालवणची जनता, सावंतवाडी, वेंगुर्ले काय ? कुठे पैसे वाटताना कुठे दिसले ? हे मला हे तरी तुम्ही मला व्हिडिओ दाखवा, असे आव्हान मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.

आ. निलेश राणेंच्या नेतृत्वाचा अभिमान – मंत्री नितेश राणे

कणकवलीत विकास झालेला आहे. तरीही जनतेने पराभव केला आहे. याबाबत थोड्यावेळाने विश्लेषण करू, आम्ही पण जरा खोलात जाऊ. नेमकं काय झालं? याची चर्चा होईल. विकास काम केल्यानंतर पण एवढीच आमची बाजू असताना पण जनतेने अगर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर जनता जनता फार विचारपूर्वक मतदान करणारी आहे. कणकवलीत निलेश राणेंच्या एन्ट्रीमुळे शहर विकास आघाडीला ताकद मिळाली आणि त्याच्यामुळे हा विजय झाला आहे.

माझा भाऊ म्हणून आ. निलेश राणेंवर मला अभिमान वाटत आहे, निश्चित मला समाधान आहे. शेवटी विजय रॅलीत निलेश राणेंचा फोटो घेवून त्यांना जल्लोष करावा लागत आहे. यातच राणेंचे यश आहे. मतदारांनी ठरवून मतदान केलेलं आहे. निलेश राणे यांचा विजय आहे. संदेश पारकर यांचे भावनिक आवाहन होते. त्यांना मतदारांनी साथ दिली.

मी पण सावंतवाडी, वेंगुर्ले कडे जाणार आहे. निश्चितच विजेत्यांचे अभिनंदन करणार आहे. मालवण मध्ये चांगल्या फरकाने शिवसेनेचा नगराध्यक्ष बसला आहे. निश्चित कौतुक आहे. पालकमंत्री हा भाजपचा आहे. जे माझ्याकडे येणार आहेत, मी त्यांना न्याय देणार आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांना मदत करणार आहे. कणकवलीत काही नगरसेवक वगळता महाविकास आघाडीचा जिल्ह्याच्या या चारही नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेल्याटी टिका मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page