आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल चा वार्षिक पारितोषिक वितरण २३ डिसेंबर रोजी …

लोक कल्याण शिक्षण संस्था संचलित ,विद्या विकास इंग्लिश स्कूल आजगाव प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता होणार असून,या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुरेंद्र विजयराव भोसले, बाळकृष्ण शेणई, रामचंद्र झांट्ये यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमात प्रथम दीपप्रज्वलन ,ईशस्तवन,स्वागत गीत, मान्यवरांचे स्वागत,प्रास्ताविक ,अहवाल वाचन, हस्तलिखित प्रकाशन,बक्षीस वितरण, पाहुण्यांचे मनोगत,अध्यक्षीय भाषण आदी कार्यक्रम होणार असून,या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगाव, मुख्याध्यापक उत्तम भागीत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page