तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बांदा नंबर १ शाळेचे घवघवीत यश…

⚡बांदा ता.१९-: सावंतवाडी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पीएमश्री केंद्रशाळा बांदा नंबर १ शाळेच्या संघांनी व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्वल केले आहे. विविध क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रातील आपली गुणवत्ता सिद्ध केली.
स्पर्धेतील यशस्वी संघ व विद्यार्थी पुढीलप्रमाणे —
लहान गट मुलगे खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मोठा गट मुलगे खो-खो तसेच मोठा गट मुली खो-खो स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवण्यात शाळेने वर्चस्व राखले. मोठा गट मुलगे रिले स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावण्यात आला.
वैयक्तिक क्रीडा प्रकारांत मोठा गट मुलगे लांब उडी स्पर्धेत मोहम्मद आझम याने द्वितीय क्रमांक मिळवला. लहान गट मुलगे उंच उडी स्पर्धेत वसंत कामटेकर याने तृतीय क्रमांक पटकावला. मोठा गट मुली लांब उडी स्पर्धेत ऐश्वर्या पुजारी हिने तृतीय क्रमांक मिळवला.
संघ स्पर्धांमध्ये मोठा गट मुली कबड्डी संघाने उपविजेतेपद मिळवले, तर लहान गट मुली खो-खो संघानेही उपविजेतेपद पटकावले.
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो:-
बांदा केंद्रशाळेचे विविध क्रीडा स्पर्धेतील विजेते स्पर्धक खेळाडू व शिक्षक.

You cannot copy content of this page