⚡बांदा ता.१९-: येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये लॅण्ड ए हॅन्ड इंडिया पुणे यांच्या तर्फे भेट देण्यात आली. प्रशाळेतील इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांना पुढील करीअर विषयक मार्गदर्शन मान्यवरांकडून करण्यात आले. तसेच कॅलिफोर्निया विद्यापीठातील रिसर्च संशोधन अंतर्गत विद्यार्थ्यांकडून विविध माहीती घेण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शाळेमध्ये एम.एस.ए.टि हा कौशल्य विकास विषय सुरू आहेत या शाळेत लॅण्ड ए हॅन्ड इंडिया पुणे या संस्थेच्या वतीने सदर हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक करिअर विषयक माहिती देण्यात आली. यावेळी लॅण्ड ए हॅन्ड इंडिया पुणे चे ट्रेनर सौ. स्मिता बहाद्दुरे, प्रजय कवाडे, फैजल शेख यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना हातात टॅब देत यामधून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कौशल्यामधून येणारी माहिती घेतली. भविष्यामधील करीअरच्या संधी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी उपस्थितीतांचे स्वागत केले. यावेळी समन्वयक राकेश परब, निदेशक भूषण सावंत, निदेशिका रिया देसाई, गायत्री देसाई उपस्थित होत्या.
फोटो:-
बांदा येथे नाबर प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवर.
नाबर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन…
