कुणकेरी–कशेलवाडी रस्ता मजबुतीकरणाचे भूमिपूजन संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१९-:
कुणकेरी–कशेलवाडी रस्त्याच्या मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन आज सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग बँकेचे संचालक श्री. महेश सारंग यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या वेळी सिंधुदुर्ग बँकेचे संचालक श्री. गजानन गावडे, कुणकेरीच्या सरपंच श्रीमती सोनिया सावंत, उपसरपंच श्री. सुनील परब, ग्रामपंचायत सदस्य माधवी मेस्त्री व अंकिता सावंत, शक्तीकेंद्र प्रमुख श्री. बाळकृष्ण सावंत, बुथ अध्यक्ष श्री. संदेश सावंत यांच्यासह श्री. कृष्णा मेस्त्री, माजी सरपंच श्री. बाळा सावंत, प्रदीप सावंत, रवी सावंत, नाना सावंत, सखाराम सावंत, प्रकाश सावंत, राजन धुरी, सुरेश सावंत, सदा सावंत, विनायक सावंत, गुंडू सावंत, बाबुराव सावंत, दशरथ मांजरेकर, चिन्मय सावंत आदी प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रस्त्याच्या मजबुतीकरणामुळे कशेलवाडी परिसरातील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार असून वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होणार आहे. ग्रामस्थांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले.

You cannot copy content of this page