कोलगाव येथे पर्यटन विकास व ग्रामसचिवालय इमारतीचे १८ डिसेंबर रोजी भूमिपूजन…

⚡ सावंतवाडी ता.१७-:
कोलगाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन गुरुवार दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, कोलगाव येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. मा. रविंद्रजी चव्हाण, खासदार-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे ना. मा. नारायणजी राणे तसेच पालकमंत्री व मंत्री (मत्स्यव्यवसाय व बंदर विकास) ना. मा. नितेशजी राणे यांच्या माध्यमातून कोलगावच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

यामध्ये श्री देवी सातेरी व श्री देव कलेश्वर मंदिर परिसर पर्यटन दृष्ट्या सुशोभीकरण (प्रादेशिक पर्यटन व क वर्ग यात्रा स्थळ योजना – मंजूर निधी रु. १ कोटी) तसेच कोलगाव ग्रामसचिवालय बांधकाम (जन सुविधा योजना – मंजूर निधी रु. २० लाख) या दोन महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे.

या विकासकामांचे भूमिपूजन सन्माननीय श्री. महेशजी रमेश सारंग यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

You cannot copy content of this page