कणकवली : थंडीत गारठल्याने कणकवलीत एका तरुणाचा मृत्यू झाला. नितीन धोंडू जगताप (वय ४५ राह. भरणी) असे त्याचे नाव आहे. शहरातील लक्ष्मी चित्र मंदिर लगत असलेल्या इमारतीखाली त्याचा मृतदेह आज सकाळी स्थानिकांना आढळून आला त्यानंतर याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना देण्यात आली.
पोलीस हवालदार विनोद चव्हाण घटनास्थळी दाखल झाले होते. नितीन जगताप हा कणकवली शहरात हॉटेल तसेच अन्य ठिकाणी मोलमजुरीचे काम करत असे. तसेच लक्ष्मी चित्रमंदिर लगत असलेल्या इमारती च्या बाहेर झोपत असे. जोरदार थंडीचा कडाका होता हा कडाका त्याला सहन न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान तो झोपत असलेल्या इमारतीच्या जिन्यावरून खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला मार देखील बसला आहे. नितीन जगताप हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे.
