श्री कलेश्वर विद्यामंदीर वेत्ये शाळा प्रभागस्तरीय समुहनृत्य स्पर्धेत द्वितीय…

सावंतवाडी : तालुक्यातील श्री कलेश्वर विद्यामंदीर वेत्ये शाळेच्या मुलींनी आजगाव येथे झालेल्या प्रभागस्तरीय समुहनृत्य स्पर्धेत मोठ्या गटात द्वितीय क्रमांक पटकावित शाळेची विजयी घोडदौड कायम ठेवली.
बुधवार, १० डिसेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मानसी समीर खांबल, तनया समीर खांबल, परी कृष्णा पेडणेकर, विणा राजन पाटकर, शुभेच्छा महेश गावकर, भुमी दिनेश नाईक, प्रांजल प्रदिप कुंभार, मृणाली परशुराम पाटकर या मुलींनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आजगाव सरपंच माना सौदागर यांनी या गटास ₹५०० चे बक्षीस प्रदान केले. शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, मुख्याध्यापक शीतल गावित तसेच समिती सदस्य, पालकवर्ग आणि शिक्षकवर्ग यांनी गटाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page