⚡बांदा ता.१२-: येथील वाळके कुटुंबियांचे आराध्य असलेल्या श्री देव वाळकेश्वर मंदिरात पारंपरिक धार्मिक उत्साहात वार्षिक पराब उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला.
पहिल्या दिवशी श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका यांना भेटीचे श्रीफळ अर्पण करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ब्राह्मणवृंदांच्या उपस्थितीत श्री देव वाळकेश्वराची सामुदायिक अभिषेक सेवा भाविकांच्या सहभागातून पार पडली. दुपारी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
सायंकाळी तुळशी विवाह व दीपोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कुरणीतील जेवणीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर श्री देव बांदेश्वर मंदिरात पारंपरिक प्रतिवर्षीचा दैवीक कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर वाळकेश्वर मंदिरात झालेल्या वार्षिक सभेचे अध्यक्षस्थान अभिजीत वाळके यांनी भूषविले. यावेळी वाळके बंधू रंजन यशवंत वाळके यांनी श्री क्षेत्र माणगाव ते काशी (वाराणसी) अशी २००० किमीची पदयात्रा दोन महिन्यात पूर्ण केल्याबद्दल आणि यापूर्वी दोन वेळा पदयात्रेने नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा श्री वाळकेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष अभिजीत वाळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष श्रीप्रसाद वाळके, सचिव रामचंद्र (भाऊ) वाळके, खजिनदार नितीन वाळके, प्रकाश वाळके, गोपाळअण्णा वाळके, उमेश वाळके, डॉ. दामोदर वाळके, धोंडी वाळके, चंदू वाळके, राजू वाळके तसेच वाळके बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विठ्ठल (भाऊ) वाळके यांनी मानले.
महाप्रसाद व वार्षिक कौलप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.
फोटो:-
बांदा येथे रंजन वाळके यांचा सत्कार करताना अभिजित वाळके. सोबत इतर मान्यवर.
श्री देव वाळकेश्वर मंदिरात वार्षिक पराब उत्सव उत्साहात संपन्न…
