⚡वेंगुर्ला ता.११-: नवीन नियुक्ती झालेले वेंगुर्ला आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय सहसचिव स्वप्नील रजपूत, आगार उपाध्यक्ष भाऊ सावळ, मिलिंद मयेकर, वैभव मांजरेकर, श्री. नांदोस्कर, श्री. मचे, इतर सभासद उपस्थित होते. या वेळी आगारातील समस्या तसेच प्रवासी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.याबाबत आगार व्यवस्थापक श्री. गावडे यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल , तसेच कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले.
वेंगुर्ला नुतन आगार व्यवस्थापक यांचे भाजपाच्या वतिने स्वागत…
