*शिवसेना नेते अतुल बंगे यांचे प्रतिपादन
*💫कुडाळ दि.१२-:* सध्या नुसते फोटो काढुन प्रसिद्धी मिळवणे आणि ही मागणी केली ती मागणी केली, हा प्रशासनाचा कारभार भोंगळ अशा आवई उठवून फक्त प्रसिद्धी मिळविणे हा एकमेव धंदा सध्या सुरु आहे मात्र स्वतः च्या जिवाची पर्वा न करता अहो रात्र मेहनत घेऊन कोरोना योध्दा म्हणून ख-या अर्थाने काम करतात ते जिल्ह्याचे पालकमंत्री ना उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक म्हणुनच आम्हाला आमच्या नेत्यांचा सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे अतुल बंगे यांनी केले. सध्या कोरोना च्या महामारीत अतिशय बिकट परिस्थिती असताना काम करणा-या लोकप्रतिनिधींवर टीका टीपणी जास्त होताना दीसते परंतु जे घरात बसून टीका करतात आणि काहीजण प्रसिद्धी मिळविणे हा एकमेव कोरोना च्या महामारीत धंदा चालविला जात आहे वास्तविक पालकमंत्री ना उदय सामंत खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक हे अशा टीकाकारांना भिक न घालता लोकांचे जिव कसे वाचले पाहीजेत यासाठी अहो रात्र मेहनत घेत आहेत खर तर नुसती सोशल मिडीया किंवा प्रसिद्धी देऊन मागण्या करण्यापेक्षा आमदार वैभव नाईक खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत हे जसे काम करतात ही जर तुम्हाला लाज वाटत असेल तर निदान सहकार्य करायला मिळत नसेल निदान टीका टीपणी तरी करु नका असा सल्ला बंगे यांनी देऊन खासदार विनायक राऊत पालकमंत्री ना उदय सामंत आमदार वैभव नाईक यांचा आदर्श घेऊन काम करा असा सबुरीचा सल्ला बंगे यांनी देऊन कोरोना च्या या महामारीच्या संकटात सर्वांनी सहकार्य केले पाहिजेत असेही बंगे यांनी सांगितले.
