पुरुष गटात शिरोडकर हायस्कूल परेल विजयी:महिलांमध्ये वाघजाई क्रीडामंडळ चिपळूणकडे विजेतेपद..
कुडाळ : एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट संचलित एस्.एल् .देसाई विद्यालय, कै .एस्. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य ,विज्ञान उच्च महाविद्यालय व कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सर्व संस्था पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपांत्य व महाअंतिम सामने अतिशय रोमांचक व उत्कंठावर्धक, जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले. प्रो कबड्डी लीग स्पर्धा गाजवणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शुभम शिंदे,अजिंक्य पवार, आदित्य शिंदे, विकास जाधव, बाळासाहेब जाधव, जयेश महाजन असे एकापेक्षा एक अशा सरस, दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पाट हायस्कूलच्या प्रशस्त मैदानावर तोबा गर्दी केली होती.
महिला गटातील पहिला उपांत्य सामना (संघमालक अक्षय रेगे) अनिकेत स्पोर्ट्स क्लब खेड रत्नागिरी विरुद्ध (संघमालक प्रशांत चव्हाण ) प्रकाश तात्या बालवडकर- पुणे यांच्यामध्ये झाला .या सामन्यात प्रकाश तात्या बालवडकर- पुणे हा संघ विजयी झाला. दुसरा उपांत्य सामना (संघमालक दिगंबर देसाई) जय गणेश मालवण विरुद्ध संघ मालक (सुमती सुधीर मळेकर) शिरोडकर हायस्कूल परेल- मुंबई यांच्यामध्ये झाला. यामध्ये डॉ. शिरोडकर हायस्कूल परेल -मुंबई संघाने विजय प्राप्त केला.
पुरुष गटातील पहिला उपांत्य सामना (संघमालक एडवोकेट रुपेश देसाई) वाघजाई क्रीडा मंडळ चिपळूण- रत्नागिरी विरुद्ध (संघमालक मंदार प्रभू -पाटकर) उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडुप- मुंबई उपनगर यांच्यामध्ये झाला या सामन्यात वाघजाई क्रीडा मंडळ चिपळूण- रत्नागिरी विजयी झाला. दुसरा उपांत्य सामना( संघमालक आप्पा फणसेकर) न्यू सम्राट सुसगाव पुणे विरुद्ध (संघमालक रवींद्र चव्हाण )स्वस्तिक क्रीडा मंडळ- मुंबई उपनगर यांच्यात झाला. त्यामध्ये न्यू सम्राट सुसगाव पुणे हा संघ विजयी झाला.
हे सर्व सामने चुरशीचे व उत्कंठावर्धक झाल्यामुळे पंचक्रोशीतील रसिक क्रीडा प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अनिकेत स्पोर्ट्स क्लब खेड रत्नागिरी विरुद्ध शिरोडकर हायस्कूल परेल मुंबई उपनगर या दोन संघांमध्ये झालेल्या महाअंतिम सामन्यात शिरोडकर हायस्कूल परेल मुंबई या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सामना जिंकत पहिल्या क्रमांकाचे विजेतेपद मोठ्या दिमाखात पटकावले. महिला गटातील वाघजाई क्रीडा मंडळ चिपळूण रत्नागिरी विरुद्ध न्यू सम्राट सुसगाव पुणे या दोन संघांमध्ये झालेल्या महाअंतिम सामन्याच्या संग्रामामध्ये वाघजाई क्रीडामंडळ चिपळूण- रत्नागिरी या संघाने अप्रतिम खेळ सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली व प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. या प्रो कबड्डी लीग मधील खेळाडूंना पाहून प्रेक्षकांनी मैदान दणाणून सोडले .प्रो कबड्डी लीग मधील खेळाडू सोबत सेल्फी घेण्यासाठी प्रेक्षकांची चढाओढ लागली होती.
स्पर्धेमध्ये पुरुष गटातील तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस उत्कर्ष नगर भांडुप मुंबई उपनगर व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर यांनी पटकावले. महिला गटातील तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जय गणेश मालवण सिंधुदुर्ग व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस तात्या बालवडकर पुणे यांनी पटकावले.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच उपांत्य व महाअंतिम सामन्याच्या दिवशी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कबड्डी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष व मालवणी कवी रोजारिओ पिंटो, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक अनिल रणदिवे, उद्योगपती मनोज नाईक, सारस्वत बँकेचे व्यवस्थापक सुनील सौदागर, तरुण भारत पत्रकार प्रमोद ठाकूर, कोकण रेल्वे कर्मचारी गणपत तेली, ( इंडियन आर्मी) भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेले प्रशालेचे माजी विद्यार्थी सुशांत म्हापणकर, रुपेश तेंडुलकर, सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघटनेचे खजिनदार मार्टिन अल्मेडा इत्यादी सर्व मान्यवर खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी व दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. रोजरिओ पिंटो यांनी आईवर आधारित मालवणी कविता सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू विजय गोवेकर, राधाकृष्ण पाटकर, शरद शिरोडकर, व्हॉलीबॉलपटू भालचंद्र ठाकूर, आकांक्षा पवार भाग्यश्री खोत, अंकिता धुरी, भाग्यश्री गावडे, खेलो इंडियामध्ये निवड झालेली आकांक्षा कुंभार या सर्व आजी व माजी खेळाडूंचा संस्था व प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ-सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून मोलाची कामगिरी करणारे मधुकर पाटील, अविनाश चाळके, अजित तांडेल, अमित गंगावणे, पंकज राणे, काशिनाथ म्हात्रे, आशिष मिसाळ, कपिल कांबळे, विद्या घाडी ,राजेंद्र अनुभवाने, महेश जाधव स्मिता ओक, सारंग, विशाल पारकर इत्यादी अनुभवी पंचांनी काम पाहिले.
या स्पर्धेसाठी पुरुष गट पारितोषिके पुढील प्रमाणे प्रथम पारितोषिक 55000 रुपये सचिन देसाई परूळे, द्वितीय पारितोषिक 45000 रुपये मिलिंद कोरडे उद्योजक, तृतीय पारितोषिक 25000 रुपये कै. रेडकर गुरुजी माजी कार्याध्यक्ष एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून, चतुर्थ पारितोषिक 15000 रुपये दीपक पाटकर खजिनदार एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, आकर्षक चषक चित्रांग देवदत्त साळगांवकर यांच्या सौजन्याने ही पारितोषिके देण्यात आली .
पुरुष गटातील उत्कृष्ट पक्कड प्रो कबड्डी लीगचा प्रसिद्ध खेळाडू विशाल जाधव 5000 रुपये, उत्कृष्ट चढाई पटू प्रो कबड्डी लीगचा प्रसिद्ध खेळाडू शुभम शिंदे 5000 रुपये व उत्कृष्ट खेळाडू प्रो कबड्डी लीगचाच प्रसिद्ध खेळाडू अजिंक्य पवार 7000 रुपयांचे बक्षीस या सर्वांनी पटकावले. या सर्वांना रोख पारितोषिके कै .सुनील म्हापणकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्मरणार्थ रोहित म्हापणकर व आकर्षक चषक चित्रांग देवदत्त साळगांवकर यांच्या सौजन्याने देण्यात आली .
तर महिला गटातील पारितोषिके पुढीलप्रमाणे प्रथम पारितोषिक 35 हजार रुपये ,द्वितीय पारितोषिक 25 हजार रुपये ,तृतीय पारितोषिक 15 हजार रुपये, चतुर्थ पारितोषिक दहा हजार रुपये ही सर्व रोख पारितोषिके कै. गं. भा.लता गोपाळ परुळेकर यांच्या स्मरणार्थ निहा निलेश परूळेकर पाट- मुंबई व आकर्षक चषक भक्ती योगेश तेली कोचरेकर यांच्या सौजन्याने देण्यात आली. या महिला गटात उत्कृष्ट पक्कडपटू डॉ. शिरोडकर हायस्कूल परेल- मुंबई संघातील वैष्णवी जाधव, उत्कृष्ट चढाईपटू शिरोडकर हायस्कूल परेल मुंबईचीच साक्षी सावंत व उत्कृष्ट खेळाडू अनिकेत स्पोर्ट्स क्लब खेड रत्नागिरी संघातील सिद्धी चाळके यांना देण्यात आली. ही सर्व रोख पारितोषिके कै. सुनील म्हापणकर माजी जिल्हा परिषद सदस्य स्मरणार्थ रोहित म्हापणकर यांच्या सौजन्याने व आकर्षक चषक भक्ती योगेश तेलीकोचरेकर यांच्या सौजन्याने देण्यात आली.
प्राध्यापक अमर प्रभू, प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक गुरुनाथ केरकर, प्रसिद्ध कथा लेखक प्रदीप केळुसकर, प्रशालेचा माजी विद्यार्थी समीर चव्हाण यांच्या उत्कृष्ट समालोचनामुळे स्पर्धेची रंगत वाढत गेली.
या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष व स्पर्धा संयोजक देवदत्त साळगांवकर, कार्यवाह विजय ठाकूर, महेश ठाकूर, हिशोब तपासणी शरद कोनकर, खजिनदार दीपक पाटकर ,राजेश सामंत, सुधीर मळेकर, नारायण तळावडेकर, अवधूत रेगे, प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर, ज्येष्ठ शिक्षक संदीप साळसकर, गुरुनाथ केरकर पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती, माजी विद्यार्थी उपस्थित होते.
