कुडाळ न्यायालयात संविधान दिन साजरा…

कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय कुडाळ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाचे शिबीर आयोजीत करणेत आले होते.
संंविधानाचे महत्व आणि त्याबध्दलची माहिती लोकांपर्यत पोहोचविणेसाठी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. कुडाळ दिवाणी न्यायालय चे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी .ए. कुलकर्णी यांचे अध्यक्षेतेखाली संपन्न या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ लिपीक श्रीमती एस.के.म्हाडगूत यांनी उद्देशिका वाचन केले. तसेच तालुका वकील संघटना कुडाळ अध्यक्ष वकील एस. जी. मळगावकर तसेच जेष्ठ विधिज्ञ आर. डी. बिले यांनी संविधान दिनानिमीत्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कनिष्ठ लिपीक एच ए कारेकर यांनी केले. ८० ते ९० वकीलवर्ग, न्यायालयीन कर्मचारी,पोलीस कर्मचारी व पक्षकार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

You cannot copy content of this page