ग्रामपंचायत कसालतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-:
कसाल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) : ग्रामपंचायत कसाल यांच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कसाल बाजारपेठ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडणार असून महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारे विविध उपक्रम यावेळी राबविण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. सुप्रिया संतोष वालावलकर (ओरोस) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी श्री. प्रफुल्ल वालावलकर (पं.स. कुडाळ) राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सदस्य श्री. संतोष कांदळकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. अवघूत मालणकर, न्यू इंग्लिश स्कूल कसालचे मुख्याध्यापक उत्तम मळगांवकर तसेच केंद्रप्रमुख उत्तम हरमलकर उपस्थित राहणार आहेत.

दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून सकाळी ९ वाजता उद्घाटन व सत्कार, १० वाजता रांगोळी स्पर्धा, ११ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी १२ वाजता फनिगेम्स, दुपारी १ वाजता अल्पोहार, दुपारी २ वाजता खेळ पैठणीचा, सायंकाळी ५ वाजता हळदीकुंकू कार्यक्रम आणि सायंकाळी ६ वाजता बक्षीस समारंभ व समारोप असा कार्यक्रमाचा आराखडा आहे.

ग्रामपंचायत कसालचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांनी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.

You cannot copy content of this page