डिंगणे येथे मोफत प्राथमिक वैद्यकीय सेवेचा शुभारंभ…

⚡बांदा ता.०४-: योग विद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई व सिंधुमित्र सेवा सहकार्य प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रँड मास्टर चोआ कोक सुई मुंबई (जिल्हास्तरीय) केंद्रिय प्रकल्प अंतर्गत मोफत प्राथमिक वैद्यकीय सेवेचा शुभारंभ आज डिंगणे गावात उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना मोफत प्राथमिक तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गावकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.
कार्यक्रमास डिंगणे देवस्थानचे मानकरी, माजी सरपंच संजय डिंगणेकर, जयेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ राऊळ तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सेवेचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, ही मोफत वैद्यकीय सेवा दर बुधवारी व शनिवारी डिंगणे, गाळेल आणि डोंगरपाल या गावांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
फोटो:-
डिंगणे येथे मोफत आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

You cannot copy content of this page