**कणकवली पंचायत समितीत ‘महायुती’ गटाची स्थापना…

गटनेतेपदी पवन भालेकर यांची निवड..

कणकवली : नवनिर्वाचित कणकवली पंचायत समिती सदस्यांनी ‘महायुती’च्या नावाने स्वतंत्र गटाची स्थापना केली. गट स्थापन केल्याबाबतचे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

या बैठकीत गटनेतेपदी पवन भालेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत पुढील कार्यकाळात विकासकामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर उपस्थित होते. तसेच बबलू सावंत, सोनू सावंत, गुरु शिंदे, सायली कृपाळ, लक्ष्मण गावडे, अण्णा खाडये, राजा जाधव, सौ. मराठे, सौ. पेडणेकर, राजश्री पवार, सौ. महेश्वरी चव्हाण, हर्षदा वाळके, पवन भालेकर, सौ. राणे, सौ. अक्षता राणे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

नवनिर्वाचित गटाच्या स्थापनेमुळे पंचायत समितीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page