मतदारांना विकासकामे व माणुसकीची सेवा करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, …

संजू परब:नेते संकटाच्या काळात दिसतच नाहीत आणि निवडणुकीत मात्र पैसे देऊन मत मागतात,अशा लोकांना जाब विचारा…

⚡सावंतवाडी ता.३०-: मतदारांना विकासकामे व माणुसकीची सेवा करणाऱ्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन संजू परब यांनी आज येथे केले. “भाजीपाल्याची व्यवस्था, अन्य सामाजिक उपक्रम आम्ही एकत्रितपणे उत्तम नियोजन करून यशस्वी केले. एकमेकांच्या संपर्कातून कोणतेही काम शक्य होते,” असे त्यांनी सांगितले.

परब म्हणाले, “आता पैशावर मत मागणारे अनेक येणार. नेते संकटाच्या काळात दिसतच नाहीत आणि निवडणुकीत मात्र पैसे देऊन मत मागतात. अशा लोकांना जाब विचारा. आपल्याला काम करणारा आणि माणुसकी जपणारा प्रतिनिधी हवा.”

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अँड.नीता सावंत-कविटकर यांच्याबद्दल बोलताना परब म्हणाले, “त्यांचे भाषण ऐकल्यास त्यांनी किती सुंदर, स्वाभाविक मराठी बोलतात हे तुम्हाला लक्षात आले असेल. स्क्रिप्ट वाचून नव्हे तर मनापासून बोलणारा सामान्य मराठी माणूस आपल्याला हवा. नीता ताई या सैनिकाच्या मुलगी आहेत. देशासाठी लढलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना आपण साथ दिली पाहिजे.” असे आवाहन परब यांनी केले.

You cannot copy content of this page