अँड निता सावंत-कविटकर :आमच्या पॅनेलमधील सर्व २१ उमेदवारांना विजयी करा..
⚡सावंतवाडी ता.३०-:
“मी जनतेतलीच एक महिला आहे. सामान्य नागरिकांसाठी दारे सदैव खुली ठेवून सेवा करण्यासाठी मी उभी आहे. उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व आमदार दीपक केसरकर यांचा आम्हाला भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळेच सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासाची हमी देऊ शकतो,” असा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. निता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केला.
शहरातील ड्रेनेज व्यवस्था, रस्ते व प्रकाशयोजना सुधारणा, महिलांसाठी रोजगारनिर्मिती, युवकांसाठी संधी उपलब्ध करून देणे तसेच पारंपरिक लाकडी खेळण्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असा शब्दही त्यांनी दिला.
याशिवाय ज्येष्ठ नागरिक व एकाकी राहणाऱ्यांसाठी “वन सिटी ॲप”द्वारे तक्रारींचे जलद निवारण करण्याची योजना त्यांनी जाहीर केली.
“आमच्या पॅनेलमधील सर्व २१ उमेदवारांना विजयी करा; सावंतवाडीला स्मार्ट सिटीकडे नेण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू,” असेही आवाहन अॅड. निता सावंत-कविटकर यांनी केले.
