सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक ही राजकीय किंवा सामाजिक न राहता उद्योगपतींची निवडणूक बनली…

राजू कासकर यांचा आरोप:पैसा वाटपाची स्पर्धा विकासकामांसाठी झाली असती, तर आज सावंतवाडीचे चित्र पूर्ण बदललं असतं..

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी नगरपालिकेची निवडणूक ही आता राजकीय किंवा सामाजिक न राहता उद्योगपतींची निवडणूक बनली आहे, अशी टीका मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी केली. दरम्यान आज सावंतवाडीत जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरून पुढील नगरपालिका निवडणुकीला मेहता, खुराणा किंवा खन्ना यांसारखे उद्योगपती येऊन लढवले, तरी त्यात आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेली पैसा वाटपाची स्पर्धा विकासकामांसाठी झाली असती, तर आज सावंतवाडीचे चित्र पूर्णतः बदलले असते, असा टोला त्यांनी लगावला. हॉस्पिटलचा प्रश्न रखडलेला ठेवणे, विविध प्रकल्पांना जाणीवपूर्वक बंदी ठेवणे आणि फक्त ईर्षेमुळे पैसा उधळणे या सगळ्या बाबींबाबत सावंतवाडीकर नक्कीच विचार करतील, असा विश्वास कासकर यांनी व्यक्त केला.

तळ्यात कारंजे आणि गल्लीबोळांत पैसा वाटप… अशी सध्याची स्थिती असली, तरी मतदार याला नक्कीच आळा घालतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सावंतवाडी नगरपालिकेचे बजेट केवळ ५६ कोटी रुपये असताना निवडणूक लढवण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत, हीच सर्वांत मोठी शोकांतिका असल्याचे राजू कासकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page