सावंतवाडीकरांनी श्रद्धा ताईंंसह भाजपच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे…

मंत्री नितेश राणे:२०१४ मध्ये राणे यांचे अस्तित्व संपवण्यासाठी कोण पुढे होते..? केसरकरांना सवाल..

⚡ सावंतवाडी ता.२९-: शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सावंतवाडीकरांनी श्रद्धा ताईंंसह भाजपच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. आम्ही आजपर्यंत कोणावरही टीका-टिप्पणी केलेली नाही. आमची निवडणूक ही केवळ विकासाच्या मुद्द्यावरच लढवली जात आहे, त्यामुळे जनतेने याचा गंभीरपणे विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचा विजय निश्चित असून तीन तारखेनंतर चारी नगरपालिकांवर भाजपचा झेंडा फडकणारच, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना राणे म्हणाले की, खासदार नारायण राणे यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याबाबत बोलणे आमदार दीपक केसरकर यांना शोभणारे नाही. २०१४ मध्ये राणे यांचे अस्तित्व संपवण्यासाठी कोण पुढे होते? आम्हाला जेलमध्ये कोणी टाकले? याची उत्तरे आधी केसरकरांनी द्यावीत, असा टोला त्यांनी लगावला.

तसेच निलेश राणे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांचे कार्यकर्ते का गप्प आहेत? उदय सामंतदेखील का गप्प आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा तीनच ठिकाणी होते, त्यांची सभा कणकवलीत का नाही होत? असा रोखठोक प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.त्यामुळे कोणी कितीही डिवण्याचा प्रयत्न केला तरी निवडणूक ही शेवटपर्यंत विकासावरच असणार असून सावंतवाडी शहराचा विकास हेच आमचे ध्येय आहे.

You cannot copy content of this page