वरची कुंभरवाडी येथील कचरा हटवला…

नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार..

कुडाळ : कुडाळ नगर पंचायत हद्दीतील वरची कुंभारवाडी येथे रेल्वे रोडवर बरेच दिवस कचऱ्याचे ढीग जमा झाले होते. नागरिकांच्या विनंतीवरून नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी तो कचरा हटविण्यात पुढाकार घेतला.
त्या संदर्भात वरची कुंभारवाडी, पाण्याच्या टॉकीजवळ साठलेल्या कचऱ्याचा येथील नागरिकांना होतं असलेल्या त्रासाबद्दल सुरेंद्र तेली यांनी याबद्दल तात्काळ कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक मंदार शिरसाठ यांना कळवले. मंदार शिरसाठ यांनी सूचना दिल्यावर तात्काळ तेथील कचरा नगर पांच्यातच्या कर्मचाऱ्यांतर्फे उचलण्यात आला.
वरची कुंभारवाडी मधील नागरिकांनी व ॲड. सुरेंद्र तेली यांनी मंदार शिरसाठ यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page