शुभदा राजे भोंसले:सालईवाडा येथे माजी मंत्री प्रवीण भोंसले यांची घेतली सदिच्छा भेट..
⚡ सावंतवाडी ता.२८-: भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धा राजे भोंसले यांच्या सासू शुभदा राजे भोंसले तसेच त्यांच्या मातोश्री यांनी सदिच्छा भेटीच्या निमित्ताने माजी मंत्री प्रवीण भोंसले व त्यांच्या पत्नी अनुराधा भोंसले यांची सालईवाडा येथील निवास्थानी भेट घेतली. निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर ही भेट घडून आली.
यावेळी पत्रकारांनी शुभदा राजेंना मतदारांच्या प्रतिक्रिया विचारल्या असता, “जनतेला आता परिवर्तन हवे आहे. श्रद्धा राजे यांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित दिसत आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या भेटीप्रसंगी ऍड. शामराव सावंत, प्रा. गोडकर, प्रा. देसाई, मनोज वाघमोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
