⚡सावंतवाडी ता.२८-: प्रभाग क्रमांक ७ मध्ये महिला उमेदवारांमध्ये सौ. आर्या सुभेदार यांनी आघाडी घेतली आहे. घरोघरी प्रचार करत असताना जनतेकडून त्यांना मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून त्या प्रभागामध्ये वास्तव्यास असून जनतेशी त्यांची घट्ट नाळ निर्माण झाली आहे. युवा व नवा चेहरा म्हणून सौ. सुभेदार यांच्याकडे नागरिक आशादायी नजरेने पाहत आहेत. प्रभागातील मूलभूत प्रश्नांसह सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, डोअर टू डोअर प्रचारादरम्यान मिळणाऱ्या प्रतिसादाच्या जोरावर त्या प्रचारात आघाडी घेत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.
