सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 12 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – अन्नधान्य पिके सन 2021-22 अंतर्गत खरीप हंगामामध्ये बियाणे वितरण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांनी दिनांक 15 मे 2021 पर्यंत महाडिबीटी प्रणालीवर अर्ज प्राप्त झालेल्या अर्जामधून ऑनलाईन लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार असून, निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना या घटकाचा लाभ देण्यात येईल. त्यासाठी प्रामाणिक बियाणे वितरणसाठी एका शेतकऱ्याला 2 हेक्टर मार्यादेतपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके अंतर्गत, खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरणासाठी पुढीलप्रमाणे अनुदान येणार आहे. भात- 10 वर्षा आतील संकरीत वाणाच्या बियाण्याकरिता, किमतीच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये प्रति क्विंटल, सुधारित बियाणे-10 वर्षा आतील सुधारित वाणाच्या बिण्याकरिता, किमतीच्या 50 टक्के किंवा 2 हजार रुपये प्रति क्विंटल भात, व 10 वर्षा वरील सुधारित बियाणे, किमतीच्या 50 टक्के किंवा 1 हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दिले जाईल. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिली.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत खरीप हंगामातील बियाणे वितरणाच्या अनुदानासाठी 15 मे पर्यंत अर्ज करावेत
