⚡मालवण ता.२७-:
मालवण शहराच्या मध्य भागाचा समावेश असलेला भाग म्हणजे प्रभाग क्रमांक सात हा असून या प्रभागातील सांडपाणी, कचरा संकलन, कमी दाबाचा आणि खंडित होणारा वीज पुरवठा, अरुंद रस्ते यासह मूलभूत प्रश्नाकडे गेली कित्येक वर्षे म्हणावे तसे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे प्रश्न सोडविण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात उतरलो आहे विकासाचे नवीन व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन आपण काम करणार असल्याने जनता आपल्या पाठीशी राहील असा ठाम विश्वास प्रभाग क्रमांक सात मधील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तेजस नेवगी यांनी व्यक्त केला आहे
मालवण प्रभाग क्रमांक सात मधील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तेजस नेवगी, गौरी मयेकर यांच्या प्रचारात माजी आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सहभागी होत घरोघर भेट देत प्रचार केला. प्रभागातून या दोन्ही चेहऱ्यांना मतदारांनी आपली पसंती दर्शविली आहे.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे शिवसेनेचे तरुण उमेदवार तेजस नेवगी यांनी या प्रभागातील जनतेचा विचार घेऊन नवीन व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली आहे. त्यांना मतदारांचा चांगला पाठींबा मिळत असल्याने स्थानिक जनता या निवडणुकीत या नव्या चेहऱ्याला संधी देत निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उमेदवार तेजस नेवगी, गौरी मयेकर यांनी गेल्या काही वर्षांत या प्रभागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे प्रभागातील या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू त्याच बरोबर पर्यटनाच्या दृष्टीने बंदर जेटी सुशोभीकरण, सेल्फी पॉइंट अन्य अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्यावर आपला भर असेल असा विश्वास प्रचाराच्या दरम्यान व्यक्त केला
यावेळी स्वप्नील आचरेकर, दीपाली शिंदे, निनाक्षी मेतर, अमोल सावंत, पायल आढाव यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
