राजेंद्र दाभाडे यांच्या दौऱ्याने कर्तव्यावरिल कर्मचाऱ्यांना मिळाले प्रोत्साहन
*💫कणकवली दि.१२-:* कोरोना काळात सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बंदोबस्तवरील आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाह आरोग्य आणि महसूल पथकातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ऑन फिल्ड ड्युटी करत त्यांना प्रोत्साहन दिले आहे. सध्या जिल्ह्यात कडक टाळेबंदी ची अंमलबजावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द एसपी राजेंद्र दाभाडे हे आज सकाळपासून ऑन फिल्ड आहेत. अगदी सकाळपासून सावंतवाडी बांदा कुडाळ दौरा करून साडेअकराच्या सुमारास एसपी कणकवलीत दाखल झाले. कणकवली पटवर्धन चौकात थांबून एसपी दाभाडे यांनी तैनात आरोग्य पथकाकडे जात कामकाजाची माहिती घेतली. आरोग्य पथकात तैनात असलेल्या आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी केली. स्वतःची काळजी घ्या आणि आपले कर्तव्य बजावा असा सल्ला देत त्यांना प्रोत्साहन दिले. स्वतः एसपी साहेबांनी दिलेल्या भेटीने आणि आस्थेने केलेल्या चौकशीमुळे शिक्षण विभागातील आरोग्य पथकातील तैनात शिक्षक लक्ष्मण वळवी भारावून गेले. तसेच पटवर्धन चौकात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सूचना देत अनावश्यक कारणासाठी कोणी बाहेर फिरताना आढळले तर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी डीवायएसपी डॉ नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्यासह हायवे टॅब चे एपीआय अरुण जाधव उपस्थित होते.
