दोडामार्ग ते माणगांव टेंबे स्वामी पायी पालखी सोहळा दि. 28 ते 30 नोव्हेंबर…

⚡बांदा ता.२७-: श्री वासुदेवानंद सरस्वती प्रतिष्ठान दोडामार्ग (श्रीपाद श्रीवल्लभ दत्तभक्त परिवार, दोडामार्ग सिंधुदुर्ग ) च्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दोडामार्ग ते माणगांव श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.आहे.यंदाचे या सोहळ्याचे आठवे वर्ष आहे.
पालखी सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर सकाळी ९.०० वा. माणगांव हुन दोडामार्ग च्या दिशेने पालखी प्रस्थान. १०.०० वा. सावंतवाडी ,११.०० वा. माजगांव, १२:०० वा. मणेरी दत्तमंदिर येथे पालखी आगमन, पालखी पूजन,
दुपारी १२:३० वा. सुरुचीवाडी, दोडामार्ग येथे पालखी पूजन आरती व दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, ( मिलींद नाईक व परिवार),
३.०० वा. पालखी प्रस्थान, ३.३० वा. दोडामार्ग, धाठवाडी, मदन सावंत व मित्रपरिवार तर्फे पूजन,
४.३० वा. आंबेली देऊळवाडी येथे पालखी पूजन ( विठोबा पालयेकर, मोहन गवंडे व मित्रपरिवार), ५.३० वा. झरेबांबर दीपक गवस यांच्यावतीने पूजन ,आरती,
६.३० वा. आंबेली माणगांवकरवाडी येथे दत्तमंदिर मध्ये आगमन, पालखी पूजन, आंबेली ग्रामस्थ मंडळी, महाप्रसाद अशोक माणगांवकर यांच्या वतीने. रात्री पालखी मुकाम
शनिवार दि.२९ नोव्हेंबर –
पहाटे ६ वा. पालखी पूजन, ६.३० वा. गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान,
सकाळी ८.०० वा. मंदार सभागृह, सासोली येथे पालखी आगमन व पूजन अल्पोपहार (ठाकूर परिवार),
१०.३० वाजता कळणे येथे आगमन (सुनीता भिसे परिवार) चहा पाणी, १२:३० वाजता श्री देवी माऊली मंदिर आडाळी पालखी पूजन व दर्शन.दुपारी १.३० वा. महाप्रसाद (आडाळी ग्रामस्थ मंडळ),
४.०० वा. डेगवे बाजारवाडी येथे पालखी पूजन (केसरकर परिवार ,डेगवे) चहा पाणी.
५.३० वा. संत सोहिरोबानाथ आंबिये मठ, बांदा येथे पालखी पूजन ,आरती व चहापाणी (संत सोहिरोबानाथ भक्त मंडळ ,बांदा), ६.४५ दत्तमंदिर इन्सुली कस्टम ऑफिस येथे आरती व पुजन,
७.४५ संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर इन्सुली डोबाशेळ येथे पालखी पूजन, आरती, भजन ,महाप्रसाद (संत सोहिरोबानाथ भक्तमंडळी इन्सुली), रात्रौ ९.०० एच. बी. सावंत व विजय माधव मित्रपरिवार माजगांव भजन सेवा .पालखी मुक्काम
रविवार दि. ३० नोव्हेंबर- पहाटे ५.०० वा. आरती, पालखी पूजन व माणगांवकडे पालखी प्रस्थान. ६.४५ माजगांव दत्त निलयः, कासारवाडा येथे पालखी आगमन, चहा पाणी व पालखी पूजन, सकाळी ८.०० वा. श्री टेंबेस्वामी दत्तमंदिर सावंतवाडी खासकीलवाडा येथे पालखी आगमन,पालखी स्वागत, पूजन, आरती, व चहापाणी श्री टेंबेस्वामी दत्तभक्त परिवार, १०.०० कोलगाव शुभांगी येंडे परिवार वतीने अल्पोपहार, १०.४५ वा. आकेरी, १२:३० माणगाव तिठा येथे पालखी आगमन, पूजन (बंटू भिसे) व प्रस्थान, १.३० ते २.३० पालखी श्री टेंबेस्वामी जन्मस्थान येथे आगमन, महाप्रसाद.४.०० वा. मनोगत व पालखी सांगता सर्वांचे आभार ,आशीर्वाद असा हा नियोजित कार्यक्रम आहे.
या पालखी सोहळ्याबाबत अधिक माहितीसाठी महेश कासार (९४२३३०२३०३) , नितीन गवस (९१३०२०९८२८) श्री वासुदेवानंद सरस्वती प्रतिष्ठान, दोडामार्ग,
(श्रीपाद श्री वल्लभ दत्तभक्त परिवार दोडामार्ग सिंधुदुर्ग)
७३५०४०००८९,७०५७२२४४२८,९८२३७१४९८५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page