व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२७-: व्ही.ऐन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा शाळेत संविधान सन्मान दिवस मोठ्या उत्साहात,साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जाण, लोकशाही मूल्यांबद्दल आदर आणि राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यापिका शिल्पा कोरगावकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेतील विद्यार्थी शिक्षक यांनी संपूर्ण संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यातआले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page