नितेश राणे:राजकीय चष्म्याने प्रत्येक बाबीकडे पाहू नका..
⚡कणकवली ता.२७-:
आमचे स्वतःचे व्यवसाय असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले असतील तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणीही बदनामी करू नये. प्रत्येकाचाच काही ना काही व्यवसाय असतो. जर नियम आम्हाला लागू होत असतील, तर ते नियम सर्वांनाच लागू झाले पाहिजेत. “हमाम में सब नंगे होते है” अशा शब्दांत मंत्री नितेश राणे यांनी ठाम भूमिका मांडली.
रवींद्रजी चव्हाण हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असल्याने त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जावे लागते. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे राजकीय चष्म्यातून पाहणे योग्य नाही. उद्या आम्ही उदय सामंत यांच्याबाबत काही बोललो आणि त्यावर असा धिंगाणा घातला, तर ते योग्य ठरेल का? असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला.
युतीच्या संदर्भातील प्रश्नावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, भाजपची एक ठरलेली पद्धत आहे. ती सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. हा संपूर्ण विषय प्रक्रियेचा भाग असून, स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांची मते घेतली जातात आणि त्यानंतर प्रस्ताव प्रदेश पातळीवर पाठवला जातो.
आमदार दिपक केसरकर यांच्या आजारपणाचा आणि निवडणुकीचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करताना राणे म्हणाले की, दिपक केसरकर यांनी मी राजघराण्याशी संबंधित नाही, उमेदवारांशीही माझा काही संबंध नाही, असे जाहीर करावे. राजघराण्याबाबत ते भावनिक आहेत आणि ते राजघराण्यातील व्यक्तीला आशीर्वाद देतील, अशी अपेक्षाही मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.
