⚡बांदा ता.२७-: बांदा शहरातील कट्टा कॉर्नर परिसरात सापडलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे परत करून प्रकाश बिले या केळी व्यापाऱ्यांनी आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे शहरात कौतुक होत आहे.
मुळ कास येथील आणि सध्या गुहागर येथे वास्तव्यास असलेले राजू पंडीत हे लग्नासाठी बांद्यात आले होते. दरम्यान त्यांचे पैशांचे पाकीट हरवले होते. प्रकाश बिले यांच्या हाती हे पाकीट लागल्यानंतर त्यांनी कोणतीही विलंब न करता याची माहिती बांदा ठाकरे शिवसेना शहरप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांना दिली. त्यांनी लगेचच सोशल मीडियावर याबाबत माहिती प्रसारित केली.
सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून मूळ मालक राजू पंडित यांचा शोध लागला आणि पाकीट सुरक्षितरित्या त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. या संपूर्ण घटनेमुळे प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण बांद्यात घडले आहे.
