उमेदवारांचा करणार डोअर टू डोअर प्रचार: ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराला येणार आणखीन वेग..
⚡सावंतवाडी ता.२७-:
ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक हे थोड्याच वेळात सावंतवाडीत दाखल होत असून नगरपरिषद निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते डोअर टू डोअर जनसंपर्क मोहीम राबवणार आहेत.
वैभव नाईक यांच्या आगमनाने सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराला आणखी वेग येणार असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी काल दादर-माहीम मतदारसंघाचे आमदार तसेच सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख महेश सावंत यांनीही सावंतवाडीत जोशपूर्ण प्रचार सुरू केला आहे.
आता प्रचारयुद्धात वैभव नाईक हेही सहभागी होत असल्याने सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. जनतेशी थेट संपर्क साधण्यावर ठाकरे शिवसेनेचा भर असून त्यातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
