*मनसेची निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी*
💫 *सावंतवाडी दि.१२-:* खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य उपचारासाठी रूग्णालयाबाहेर रेट बोर्ड लावण्याची सक्ती करावी तसेच कोवीडच्या उपचारासाठी विविध चाचण्यांच्या नावावर खाजगी रुग्णालयात अवास्तव बिले आकारून सर्वसामान्य नागरिकांची लूट थांबावी यासाठी लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी शाखेच्या वतीने प्रांताधिकारी सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार कार्याध्यक्ष संतोष भैरवकर युवती अध्यक्ष ललिता नाईक उपाध्यक्ष शुभम सावंत सचिव आकाश परब आदि उपस्थित होते.
