सावंतवाडी ता.२४-: तालुक्यात सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.दरम्यान, सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असतानाच या पावसामुळे उमेदवारांचीही धावपळ सुरू झाली.
पावसामुळे मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठींचे वेळापत्रकही विस्कळीत झाले.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. भात कापणीचा हंगाम सुरू असताना पडलेल्या या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी आधीच कापून ठेवलेले भात ओलाव्यामुळे खराब होण्याची शक्यता वाढली आहे. अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे नागरिकांसह शेतकरी वर्ग चिंतित आहे.
