निलेश राणे:शिंदे शिवसेनेची मोठी भर; अनेक सरपंच-कार्यकर्त्यांचा प्रवेश..
⚡मालवण ता.२४-: शिवसेनेचा धनुष्यबाण जिल्हयात सर्वत्र दिसून येईल. नगरापालिका आणि यापुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये फक्त शिंदे शिवसेनेचाच धनुष्यबाण जिंकला पाहिजे आणि यासाठी सर्व ताकद आम्ही लावणार आहोत असे प्रतिपादन मालवण कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी येथे बोलताना केले
मालवण येथे आमदार निलेश राणे यांच्या आमदारकीच्या वर्षपुर्तीच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मालवण तालुक्यातील आडवली मालडी मतदार संघातील उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी बंडू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनेक सरपंच आणि बहुसंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश घडवून आणला यावेळी व्यासपिठावर संजय पडते, बबन शिंदे, आनंद शिरवलकर, प्राजक्ता शिरवलकर, बाळू कुबल, उमेश नेरूरकर, सुनील घाडीगावकर, विनायक बाईत, विश्वास गावकर, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी मालवण कुडाळ मतदार संघाचा सर्वांगिण विकास करण्याचे ठरवून आम्ही काम करत आहोत. कोण आमच्यावर टिका करतो कोण काय बोलतो याकडे आम्ही लक्ष देत नाही. मालवण शहरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे २१ उमेदवार विजयी करून खासदार नारायण राणे यांना भेट देण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात आहोत. आम्ही कोणावरही टिका करणार नाही, फक्त आम्ही विकास कामांवर मते मागणार आहोत, असेही श्री. राणे म्हणाले.
यावेळी ठाकरे शिवसेना माजी विभागप्रमुख बंडू चव्हाण, असगणी सरपंच साक्षी चव्हाण, सदस्य मनोहर कासले, रामचंद्र राऊत, यशवंत राऊत, विभाग प्रमुख संतोष घाडी, शाखाप्रमुख विनायक राऊत, माजी सरपंच बाबु परब, ओवळीये ग्रामपंचायत सदस्य साक्षी गोसावी, माजी सरपंच अंबाजी सावंत यांच्यासह असंख्य उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, हा पक्षप्रवेश म्हणजे आमदार राणे यांनी आमदारकीच्या पहिल्या वर्षाची भेट आहे आता आडवली मालडी मतदार संघात शिंदे शिवसेनेचीच एकहाती सत्ता आल्याचेही श्री सामंत यांनी जाहीर केले
सर्वसामान्यांना फसविणारे स्थानिक भाजपचे शहर अध्यक्ष मालवण बंदर जेटी येथे सर्वसामान्य मालवणातील गरीब लोकांसाठी स्टॉल लावण्यासाठी ६० हजार रूपये घेत लुबाडून केली आहे, असा आरोप करत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी बंदरजेटीवरील लाभार्थ्यांना मी स्वतः २० हजार रूपयांत स्टॉल उपलब्ध करून देऊ शकतो. भाजपच्या मंडळींनी तब्बल २५ लाख रूपयांचा भ्रष्टाचार या स्टॉलमध्ये केला आहे, आणि तीच मंडळी जनतेत मते मागत आहे. यामुळे भाजपचा भ्रमाचा भोपळा या निवडणुकीत फुटणार आहे. भाजपच्या स्थानिकांनी सेवा करण्यासाठी सत्ता नको तर जनतेला फसविण्यासाठी हवी आहे. पोट भरण्याचे काम ही भाजपची मंडळी करत आहे, असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यावेळी म्हणाले.
याप्रसंगी बाळू कुबल, बबन शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन भाई मांजरेकर यांनी केले.
