तेंडोलीत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡कुडाळ ता.२३-: तालुक्यातील तेंडोली ग्रामपंचायत आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नवोदित दुग्ध व्यावसायिकांसाठी आयोजित दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील ५५ दुग्धव्यवसायिकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. तसेच दुग्ध व्यवसाय करणाऱ्या ३५ व्यावसायिकांना प्लास्टिक घमेले वाटप करून त्यांना आवश्यक साहित्याची मदत करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. सरपंच अनघा तेंडोलकर, उपसरपंच दिगंबर मुणनकर, ग्रा. पं. सदस्य कवशल राऊळ, बाळू पारकर, संदेश प्रभू , सदस्या साक्षी राऊळ, उत्कर्षा प्रभू, प्रियांका परब, दुग्ध विकास सोसायटीचे चेअरमन अरविंद तेंडोलकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. खवणेकर, विकास सोसायटी चेअरमन संदीप पेडणेकर, माजी सरपंच मंगेश प्रभू, तलाठी श्रीमती भोगटे, प्रशिक्षक यशवंत पंडीत, श्री. मुननकर आदी उपस्थित होते.
शेतीपूरक व्यवसायात दुग्ध उत्पादन हे महत्त्वाचे स्थान राखून आहे. योग्य प्रशिक्षण, सल्ला आणि मार्गदर्शनाद्वारे गोठा बांधणी, जनावरांचे वैज्ञानिक पद्धतीने पोषण, दूध उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक उपाय, तसेच नियमित लसीकरण यांसारख्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायत अधिकारी सुनिता कदम यांनी स्वागत केले. अनघा तेंडोलकर यांनी नवोदित व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संस्था समन्वयक समीर शिर्के यांनी केले.

You cannot copy content of this page