कुडाळ : गोव्यात मुख्यालय असलेली प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय91 ही गोव्यात सुरू असलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) अधिकृत देशांतर्गत विमान भागीदार आहे. हा लोकप्रिय महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित केला जात असून देशभरातून आणि जगभरातून चित्रपटप्रेमी आणि नामांकित व्यक्ती गोव्यात दाखल होत आहेत.
या भागीदारीमुळे गोव्यातील दोन उपक्रम एकत्र येत आहेत. दोघांचाही उद्देश लोकांना जोडणे आणि अनुभव एकत्र आणणे आहे. या सहकार्यामुळे फ्लाय91 मार्फत भारतातील लहान शहरांमधून येणाऱ्या प्रतिनिधी, दिग्दर्शक आणि प्रेक्षकांना इफ्फीला पोहोचणे आणखी सोपे होणार आहे. त्यामुळे हा महोत्सव लोकांसाठी पूर्वीपेक्षा अधिक सर्वसमावेशक आणि सहज उपलब्ध होईल.
इफ्फीमध्ये, आयनॉक्स पणजी येथे असलेल्या फ्लाय91च्या किऑस्कवर विमान कंपनीकडून एक स्पर्धा आयोजित केली आहे. प्रतिनिधींना त्या किऑस्कवर फोटो काढून फ्लाय91च्या इंस्टाग्राम हँडलला टॅग करावे लागेल आणि निवडलेल्या विजेत्यांना मोफत विमानप्रवासाची संधी मिळू शकते.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय व गोवा सरकारच्या एन्टरटेनमेन्ट सोसायटी ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित होणारा इफ्फी हा देश-विदेशातील हजारो लोकांना आकर्षित करतो. प्रादेशिक विमानसेवेच्या वाढत्या जाळ्यामुळे महोत्सवासाठी येणाऱ्या प्रेक्षक आणि कलाकारांना अधिक चांगली हवाई सुविधा मिळणार आहे. सध्या फ्लाय91 गोवा, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, सिंधुदुर्ग, सोलापूर, जळगाव आणि लक्षद्वीपमधील अगत्ती यांसारख्या शहरांना जोडत आहे, ज्यामुळे महोत्सव नव्या भागांतील लोकांपर्यंत पोहोचू शकतो.
भागीदारीबद्दल बोलताना, फ्लाय91 चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोज चाको म्हणाले, गोव्यात मुख्यालय असलेली विमान कंपनी म्हणून, इफ्फी सोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. इफ्फी हा फक्त गोव्यातीलच नव्हे तर भारतातील सर्वात प्रतिष्ठित सांस्कृतिक महोत्सवांपैकी एक आहे. इफ्फी आणि फ्लाय91 दोघेही भारताला जोडण्याचे कार्य करतात. इफ्फी चित्रपटांच्या माध्यमातून आणि फ्लाय91 प्रादेशिक हवाई संपर्काद्वारे. या भागीदारीमुळे टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील आणि गोव्यातील प्रवास अधिक सोपा, जलद आणि टिकाऊ करण्याच्या आमच्या ध्येयाला बळ मिळत आहे.
ऑपरेशन्सच्या पहिल्याच वर्षात, फ्लाय91 ने ३,५०० हून अधिक उड्डाणांमध्ये १.७ लाखांपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली आहे. कंपनी सध्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथून एटीआर ७२-६०० या विमानांच्या ताफ्याद्वारे सेवा देते. पुढील पाच वर्षांत ५० पेक्षा जास्त भारतीय शहरांना जोडण्याची विमान कंपनीची योजना आहे.
५६ व्या इफ्फीसाठी फ्लाय91 अधिकृत देशांतर्गत विमानसेवा भागीदार…
