⚡सावंतवाडी ता. २३-: ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार निशांत तोरसकर आणि गीता सुखी यांनी आज श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी उमेदवारांनी जनतेसमोर विकासाचं व्हिजन ठेवत कोणावरही टीका न करता सकारात्मक प्रचार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
तोरसकर म्हणाले, “आम्ही जनतेकडे विकासाचे मुद्दे घेऊन जात आहोत. आमचं ध्येय हे केवळ विकास व रोजगार निर्माण करणे आहे. आमच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, बहुमताने विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.”
प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाला माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, नितेश माडगूत, फयाज मुजावर, अनिकेत मोरे, प्रेरणा वाडकर, पूजा खोपकर यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
