बाजारपेठेतील सीसीटीव्ही तातडीने सुरू करा…

नगरसेवक देव्या सूर्याजी यांची मागणी: सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन केले सादर..

⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ येथे बंद असणारे CCTV चालू करणे व रहदारीच्या ठिकाणी मच्छी मार्केट येथे होमगार्ड नेमणूक करणे यासाठी प्रभाग क्रमांक ६ मध्ये जय भवानी चौक सालईवाडा,जय प्रकाश चौक, गांधी चौक येथील बरीच वर्षे बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करावेत तसेच भर बाजारपेठेमध्ये होणारी चोरी व इतर समस्या अन्य पुरावे निशी बाबींसाठी कॅमेरांची अत्यंत गरज आहे यासाठी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी हि विनंती नगरसेवक श्री.देव्या सूर्याजी यांनी केली.

मच्छी मार्केट परिसरात दर रविवार व बुधवार होणारी वाहनांची कोंडी व त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहाणा-या रहिवासी व नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे या परिसरात १ रुग्णवाहिका सिरीयस रुग्ण घेऊन १तास कोंडी अडकली असे गंभीर प्रकार घडतात याला प्रशासन जबाबदार राहील म्हणून दर रविवारी बुधवारी ४ होमगार्ड किंवा पोलीस या ठिकाणी नेमण्यात यावे असे नगरसेवक श्री.सुर्याजी यांनी पोलीस निरीक्षक श्री.अमोल चव्हाण यांना भेटून लेखी निवेदन देऊन केली याची प्रत मा.पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग व मा.पोलीस उप अधीक्षक यांना दिली यावेळी ॲड.प्रथमेश प्रभू, ॲड प्रसाद नाटेकर, प्रफुल गोंदावळे,निलांग सावंत उपस्थित होते.

You cannot copy content of this page