⚡बांदा ता.०३-: मराठी साहित्य व संस्कृतीला समर्पित “भोपाली कट्टा” या मराठी यूट्यूब चॅनलचा भव्य शुभारंभ भोपाळ-मनीषा मार्केट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. “होम ऑफ टेक्नो क्रिएशन प्रोडक्शन हाऊस”तर्फे आयोजित या कार्यक्रमास भोपालमधील साहित्य, कला व माध्यम क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे उद्घाटन मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीचे संचालक संतोष गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषेच्या प्रसारासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान मुंबईच्या ज्येष्ठ साहित्यिका व संशोधक डॉ. निर्मोही फडके यांची मुलाखत रंगकर्मी व दिग्दर्शक विवेक सावरिकर मृदुल यांनी घेतली. मराठी साहित्य, बदलते सामाजिक संदर्भ आणि नव्या पिढीची भूमिका यावर यावेळी सखोल चर्चा झाली. या पॉडकास्टचा पहिला भाग ६ मार्च रोजी होळीच्या निमित्ताने प्रसारित होणार आहे.
चॅनलचे संचालक संजय पाथ्रडकर यांनी “भोपाली कट्टा” हा संपूर्ण मराठी समाजाचा मंच असून साहित्य, संगीत, रंगभूमी व युवा प्रतिभांना व्यासपीठ देण्याचा मानस असल्याचे सांगितले. या प्रसंगी मराठी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. भोपालमधील मराठी संस्कृतीला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
फोटो:-
भोपाळ येथे कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर.
भोपाळमध्ये ‘भोपाली कट्टा’ मराठी यूट्यूब चॅनलचा भव्य शुभारंभ…
