सावंतवाडी : सावंतवाडीत पालकमंत्री नितेश राणेंनी कॉर्नर बैठकांवर भर दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधला. भाजपच्या विचारांचे नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.
नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील प्रभाग क्रमांक ५ मध्ये ही बैठक झाली. भाजपच्या विचारांच सरकार देशात, राज्यात आहे. त्यामुळे शहरात देखील भाजप विचारांची सत्ता आणण्यासाठी भाजपला पाठिंबा द्या, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेसह नगरसेवक पदांच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलं.यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, उमेदवार भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, दुराली रांगणेकर, युवराज लखमराजे भोंसले, महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, ॲड. संजू शिरोडकर, केतन आजगावकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
