सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. कॉर्नर बैठकांवर त्यांनी भर दिला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांच्यासह २० ही नगरसेवक विजयी होतील असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.
बाहेरचावडा परिसरात प्रभाग १ व ४ मध्ये त्यांनी जोरदार प्रचार करत आपली ताकद दाखवली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांचा प्रचार त्यांनी केला. तसेच येथील उमेदवार उमेदवार ॲड. सायली दुभाषी, प्रसाद नाईक, हर्षा जाधव, बासिर पडवेकर यांना जनता मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक नासिर शेख, काशिनाथ दुभाषी, बंटी पुरोहित, आबा केसरकर, सचिन साटेलकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
